महिलांची सद्यस्थिती, त्यांचा विकास आणि त्यांच्या प्रश्नांचा अभ्यास करणारी ‘दृष्टि’ ही एक अखिल भारतीय स्तरावरील नामांकित संस्था आहे. महिलांची धोरणे, शासकीय योजना, विविध संस्था-संघटनांचे काम यांचा अभ्यास करून महिलांचे प्रबोधन करण्याचे काम १९९६पासून ‘दृष्टि’च्या माध्यमातून केले जाते. विविध वृतपत्रे व नियतकालिकांमधील महिलाविषयक बातम्या व लेखांचे संकलन करून दरमहा ‘महिला विश्व’ नावाचे मासिकही ‘दृष्टि’ प्रकाशित करते. आजवर ‘दृष्टि’ने अनेक महत्त्वपूर्ण सर्वेक्षणे करून त्यांचे अहवाल प्रकाशित केले आहेत. उदाहरणार्थ : Status of Women in India (Education, Health, Employment), झारखंड-छत्तीसगड-ओरिसातील वनवासी तरुणींचे घरकामासाठी स्थलांतर, हरियाणातील घटत्या स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तराचा तिथल्या विवाहपद्धतीवर झालेला परिणाम, ईशान्य भारतातील महिलांची सामाजिक-आर्थिक स्थिती, महाराष्ट्रातील बचत गटातील महिलांचे सामाजिक सक्षमीकरण इत्यादी.
या वर्षीपासून ‘दृष्टि’च्या वतीने दोन अभ्यासकांना पाठ्यवृत्ती दिली जाणार आहे. ज्युनियर फेलोशिपसाठी २५ हजार रुपये आणि सीनियर फेलोशिपसाठी ३५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यासाठी २० जून २०२३ पर्यंत पुढीलप्रमाणे अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पाठ्यवृत्तीचा कालावधी सहा महिने (१ ऑगस्ट २०२३ ते ३१ जानेवारी २०२४) इतका राहील. संशोधनाची भाषा मराठी असावी.
पाठ्यवृत्तीसाठी विहीत मुदतीत आलेल्या सर्व अर्जांची छाननी करून निवडक व्यक्तींना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. अभ्यासातील प्रगती व अभ्यासाची योग्य दिशा पाहून टप्प्याटप्प्याने पाठ्यवृत्ती दिली जाईल. संशोधकाने ‘दृष्टि’च्या वतीने नेमून दिलेल्या मार्गदर्शकाच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. संशोधन प्रकाशनाचे सर्व अधिकार ‘दृष्टि’कडे राखीव असतील.
सचिव
अंजली देशपांडे
>> ‘दृष्टि’ ज्युनियर फेलोशिप (नवोदितांसाठी पाठ्यवृत्ती)
विषय : कुटुंब संस्थेशी (शहरी, ग्रामीण, वनवासी, भटके-विमुक्त) संबंधित कोणत्याही एका महत्त्वाच्या पैलूसंदर्भात सर्वेक्षण करून दहा हजार शब्दांत अहवाल सादर करणे.
पात्रता : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेली अथवा पदव्युत्तर शिक्षण घेणारी व्यक्ती
१ ऑगस्ट २०२३ रोजी वय वर्ष ३५ पेक्षा कमी असावे.
>> ‘दृष्टि’ सीनियर फेलोशिप (अनुभवी / तज्ज्ञ व्यक्तींसाठी)
विषय : कुटुंब संस्थेचा उगम, तिचा विकास, सद्यस्थिती, भारतातील तिचे विविध टप्पे, भारतीय कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व यापैकी एक किंवा या संबंधित कोणताही विषय.
चिंतनपर लिखाण अपेक्षित. दहा हजार शब्दमर्यादेचा लेख असावा.
पात्रता : कोणत्याही विद्याशाखेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण.
महिलाविषयक प्रश्नांवर संशोधन वा कामाचा किमान पाच वर्षांचा अनुभव अपेक्षित.
>> दोन्ही पाठ्यवृत्तींसाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांकः २० जून २०२३
अर्जप्रक्रिया : शिक्षण व अनुभवासह संपूर्ण बायोडाटा.
नेमका संशोधन विषय, संशोधन पद्धती, सहा महिन्यांचे अभ्यासाचे स्वरूप याबाबत ५०० ते ७०० शब्दांत प्रस्ताव सादर करावा.
‘दृष्टि’च्या ईमेल आयडीवर आलेले प्रस्तावच ग्राह्य धरले जातील.
अधिक माहितीसाठी संपर्कः ८६६८२१०१७४ (वेळ दु. १२.०० ते संध्या. ५.००)
पाठ्यवृत्ती निवड प्रक्रिया - निकाल
दृष्टि स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्राने 2023 या वर्षा करिता जाहीर केलेल्या पाठयवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्या अंतर्गत ज्यांनी प्रस्ताव पाठविले त्या पैकी
६ जणींच्या मुलाखती दि. 22 जुलै 2023 रोजी दुपारी घेण्यात आल्या.
त्यापैकी खालील दोन जणींची निवड - निवडसमितीने केली आहे.
- अनघा कुलकर्णी (पुणे)
- इरावती महाजन (मुंबई)
या दोघींचे मनःपूर्वक अभिनंदन!
निवड झालेल्यांनी 'दृष्टि' च्या कार्यालयाशी संपर्क साधावा.